(शाहूनगर) : शाहूनगर येथील श्री शाहू सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक भरत गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर बोडके आणि गोपाळ सैंधाणे उपस्थित होते.

वाचनालयाचे उपाध्यक्ष तथा व्याख्याते राजेंद्र घावटे आणि विश्वस्त मनीषा पाटील यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली.

खजिनदार राजेंद्र पगारे यांनी प्रास्ताविक केले. ग्रंथपाल अनिता पाटील, सहग्रंथपाल तेजश्री घेवारी आणि सहाय्यक रवींद्र अडसूळ यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन गणेश सहाणे यांनी केले.