(पिंपरी ): सांगवी येथील संविधान चौकातील संविधानाच्या प्रास्ताविका स्मारकाला कथितरीत्या हटवून तोडफोड केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. २२) सकाळी ११ वाजल्यापासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. स्मारकाची पूर्ववत पुनर्स्थापना करावी आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात(Constitution Chowk Sangvi) आला.
या आंदोलनात पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे कार्यकर्ते, पुरोगामी व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि संविधानप्रेमी नागरिक सहभागी झाले आहेत. संविधानाने दिलेली समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये जपण्यासाठी आंदोलन सुरू केल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी (Constitution Chowk Sangvi)सांगितले.
स्मारक हटविण्याच्या आणि तोडफोडीच्या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. महापालिकेच्या ‘ह’ प्रभाग अधिकाऱ्यांनी १५ ऑक्टोबर रोजी या प्रकरणाबाबत पोलीस आयुक्तांना लेखी कळविल्याचा संदर्भही त्यांनी दिला. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात (Constitution Chowk Sangvi)आले.
या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, विचारवंत मानव कांबळे, मारुती भापकर, आनंदा कुदळे, धनाजी येळकर पाटील, बी. बी. शिंदे, शाहबुद्दीन शेख, रवींद्र भोसकर, हरीश शिंदे, वीरेंद्र गायकवाड, संदीप शिंदे, सूरज माने, सदाशिव तळेकर, डेनिस देवनसन, नवीलाल मुल्ला, कबीर मोहम्मद, हिराचंद जाधव, हरीश डोळस, बाबा गायसमुद्रे, मिलिंद बनसोडे, देवदत्त रानवडे, अनिता साळवे, अनिता सोनवणे, रितिका शर्मा आणि महावेद वाळुं (Constitution Chowk Sangvi)होते.

