(पिंपरी-चिंचवड) : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला सांगवी येथील संविधान चौकातील भारतीय संविधानाची प्रास्ताविका (उद्देशिका) कोणत्याही प्रशासकीय परवानगीशिवाय तोडण्यात आल्याचा आरोप पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी पोलीस आयुक्तांना लेखी पत्राद्वारे केली(Sangvi Constitution Chowk) आहे.

काँग्रेसने दिलेल्या पत्रानुसार, संविधानाच्या प्रास्ताविकेची मोडतोड कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय करण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनीही यासाठी परवानगी देण्यात आली नसल्याचे स्पष्ट केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. स्थानिक भाजप नगरसेविका तथा ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षा तृप्ती संतोष कांबळे यांनी सामूहिकरीत्या हे कृत्य घडवून आणल्याचा आरोपही पत्रात करण्यात आला (Sangvi Constitution Chowk)आहे.

“भारतीय संविधान हे १४० कोटी भारतीयांच्या अस्मितेचे प्रतीक आहे. संविधानाचा आणि महापुरुषांच्या विचारांचा अपमान काँग्रेस कदापि सहन करणार नाही. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने निष्पक्ष चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत आणि संविधान चौकाचे पुनर्स्थापन करावे. अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा नरेंद्र बनसोडे यांनी (Sangvi Constitution Chowk)दिला.