(निगडी ): मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि संतपरंपरेचा समृद्ध वारसा आहे. या भाषेचे वैभव जपताना शिक्षण, साहित्य, प्रशासन आणि दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढविणे आवश्यक आहे, असा सूर ‘मराठी भाषा काल, आज आणि उद्या’ या परिसंवादात उमटला. राष्ट्रीय पुस्तक मेळ्याच्या उपक्रमांतर्गत समरसता साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने शुक्रवारी (दि. ९ ऑक्टोबर) स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, निगडी येथे आयोजित परिसंवादाला साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद(Marathi Language Seminar) मिळाला.

परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध व्याख्याते तथा पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समितीचे कार्यवाह राजेंद्र घावटे होते. लेखिका व कवयित्री राजश्री मराठे यांनी ‘मराठी भाषा संवर्धनात संतांचे योगदान’, मातंग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे यांनी ‘आधुनिक शिक्षण आणि मातृभाषा’, तर समरसता साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे माजी अध्यक्ष कैलास भैरट यांनी ‘माय मराठीचे मारेकरी कोण?’ या विषयांवर विचार मांडले. यावेळी डॉ. गिरीश आफळे, सारंग पाफळकर, रमेश वाकनीस यांच्यासह शहरातील साहित्यिक व साहित्यप्रेमी उपस्थित होते. मानसी चिटणीस यांनी सूत्रसंचालन(Marathi Language Seminar) केले.

#संतसाहित्याने मराठीला दिली प्रतिष्ठा

संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम यांच्यासह विविध संतांनी अभंग, ओव्या आणि आध्यात्मिक विचारांतून मराठी भाषेला लोकमानसात प्रतिष्ठा मिळवून दिली. संस्कृतमधील ज्ञानपरंपरा सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचे कार्य संतांनी लोकभाषेच्या माध्यमातून केले. त्यामुळे मराठी भाषा भक्ती, समता, बंधुभाव आणि सामाजिक प्रबोधनाचे प्रभावी माध्यम बनली. या संतपरंपरेचा अभ्यास करून तिचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात (Marathi Language Seminar)आली.

मातृभाषेतील शिक्षणातून ज्ञानाचा पाया

मातृभाषेतील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची आकलनक्षमता, विचारशक्ती, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. इंग्रजीसह अन्य भाषांचे ज्ञान आवश्यक असले, तरी त्यासाठी मातृभाषेकडे दुर्लक्ष करता कामा नये. मराठीचा शिक्षणातील वापर वाढविणे, दर्जेदार संदर्भसाहित्य उपलब्ध करून देणे आणि विज्ञान-तंत्रज्ञानातील ज्ञान मराठीत आणणे आवश्यक असल्याचे मत डॉ. धनंजय भिसे यांच्या विषयावरील चर्चेतून पुढे(Marathi Language Seminar) आले.

मराठीच्या वापराबाबत आत्मपरीक्षण आवश्यक

‘माय मराठीचे मारेकरी कोण?’ या विषयातून कैलास भैरट यांनी मराठी भाषेच्या वापराबाबत समाजाने आत्मपरीक्षण करण्याची गरज मांडली. मराठीच्या ऱ्हासाची जबाबदारी केवळ शासन किंवा शिक्षणसंस्थांवर टाकून चालणार नाही. घरातील संभाषण, शिक्षण, व्यावसायिक व्यवहार आणि सार्वजनिक जीवनात मराठीला किती स्थान दिले जाते, याचा प्रत्येकाने विचार करायला हवा, असा मुद्दा चर्चेतून अधोरेखित (Marathi Language Seminar)झाला.

अध्यक्षीय भाषणात राजेंद्र घावटे म्हणाले, “संतांनी मराठीला ज्ञानभाषा बनवली. शिवरायांमुळे ती पुन्हा व्यवहारभाषा झाली. मराठी भाषा ही नाथांच्या भागवताची पैठणी नेसलेली, ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीचा मुकुट ल्यालेली आणि तुकोबांच्या गाथेचा मळवट भरलेली आहे. नामदेवांच्या कीर्तनाचा शालू पांघरलेली आणि सकल संतांच्या साहित्याचे अलंकार धारण केलेली ही मराठी शिवरायांच्या स्वराज्याची पताका खांद्यावर घेऊन उभी आहे. तिचा डौल कायम राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची(Marathi Language Seminar) आहे.”

मराठी भाषेचा अभिमान केवळ घोषणांपुरता मर्यादित न राहता तिचा प्रत्यक्ष व्यवहारात वापर वाढला पाहिजे. वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन, नव्या लेखकांना संधी, दर्जेदार साहित्यनिर्मिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मराठीचा वापर वाढविणे आवश्यक असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात (Marathi Language Seminar)आले.

परिसंवादाची प्रस्तावना सुहास घुमरे यांनी केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जयश्री श्रीखंडे, उज्ज्वला केळकर, हेमंत जोशी आणि पुष्कर भातखंडे यांनी परिश्रम घेतले. शिवानंद चौगुले यांनी आभार (Marathi Language Seminar)मानले.

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ साहित्यिकांची नव्हे, तर प्रत्येक मराठी भाषिकाची जबाबदारी आहे. घराघरांत मराठीचा सन्मान, शिक्षणात तिचा प्रभावी वापर आणि वाचनातून विचारांची समृद्धी साधल्यास माय मराठीचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल, असा संदेश या परिसंवादातून देण्यात (Marathi Language Seminar)आला.