पूणे :हिंजवडी मेट्रो टप्पा-१ ला वाहतूक सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व परवानग्या मिळून तब्बल दोन महिने उलटले आहेत. मात्र, अद्याप मेट्रो सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेली नाही. केवळ व्हीआयपी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत मेट्रो सेवा रखडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कोणत्याही औपचारिक उद्घाटनाची वाट न पाहता हिंजवडी मेट्रो टप्पा-१ तातडीने प्रवाशांच्या सेवेत सुरू करावा, अशी मागणी चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश अग्रवाल यांनी केली (Hinjewadi Metro)आहे.

जुलै महिन्यातच हिंजवडी मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी आवश्यक परवानगी मिळाल्याचे अग्रवाल यांनी म्हटले आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्घाटनासाठी वेळ उपलब्ध न झाल्याने गेल्या दोन महिन्यांपासून मेट्रो सेवा सुरू झालेली नाही, असा दावा त्यांनी केला (Hinjewadi Metro)आहे.

दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यास अधिकृत उद्घाटनाचा कार्यक्रम आणखी काही काळ लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिंजवडी परिसरातील हजारो आयटी कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांना दररोजच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत (Hinjewadi Metro)आहे.

निवडणूक आचारसंहितेच्या कारणास्तव मेट्रो सेवा आणखी काही महिने सुरू न केल्यास नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे राजकीय श्रेयवाद आणि उद्घाटनाचा सोहळा बाजूला ठेवून प्रशासनाने मेट्रो टप्पा-१ तातडीने प्रवाशांसाठी खुला करावा, अशी ठाम मागणी राजेश अग्रवाल यांनी केली(Hinjewadi Metro) आहे.