(पिंपरी-चिंचवड ): भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) उद्योग आघाडीच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. उद्योग, व्यवसाय आणि नवउद्योजकतेच्या क्षेत्रात तरुणांना प्रोत्साहन देणे, हा या कार्यकारिणीमागील उद्देश (BJYM Pimpri Chinchwad)आहे.

भाजयुमो उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष आदित्य कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, भाजयुमोचे माजी प्रदेश सचिव अजित कुलथे, शहराध्यक्ष दिनेश यादव, जिल्हा सचिव आशिष राऊत आणि भाजपचे जिल्हा सचिव गिरीष देशमुख उपस्थित(BJYM Pimpri Chinchwad) होते.

नव्या कार्यकारिणीत शहर सचिवपदी प्रविण रणखांबे, विजय सोनवणे, आकाश मोरे आणि अभिषेक बामणे यांची, तर शहर उपाध्यक्षपदी शिवदत्त जाधव, अजय बामणे आणि दीपराज गुप्ता यांची नियुक्ती करण्यात(BJYM Pimpri Chinchwad) आली.

यावेळी आमदार महेश लांडगे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला बळ देण्यासाठी औद्योगिक नगरीतील तरुणांना एकत्र आणून उद्योजकतेला चालना देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शहराच्या विकासासह पक्षाच्या बळकटीकरणासाठी नवी कार्यकारिणी योगदान देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त (BJYM Pimpri Chinchwad)केला.